२०२० मध्ये संपूर्ण जगभरात कोरोनाने मोठा हाहाकार माजवला होता. जगभरात हजारोंच्या संख्येने रुग्ण दगावले होते. जगासह संपूर्ण देशात हाहाकार माजवला होता दरम्यान आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असल्याची अपडेट समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार , आंध्र प्रदेशात कोरोनामुळे 4 वर्षांपूर्वी एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाने एन्ट्री केली आहे. आंध्रपदेशच्या कडप्पा जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच 4 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सर्व 4 रुग्ण हे आरोग्य विभागाच्या देखरेखी खाली आहेत. या 4 पैकी 3 जणांना घरात विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. तर चौथ्या रुग्णामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णावर कोरोनासाठी विशेष तयार केलेल्या वॉर्डात तयार करण्यात येत आहे. या सर्व रुग्णांचे रिपोर्ट हे कडप्पाच्या वायरोलॉजी लॅबमध्ये RT-PCR टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले. चारही रुग्ण कडप्पाच्या वेगवेगळ्या भागातील आहेत. या चौघांनी कोरोनाकाळात लसीकरण देखील झालं होतं. तर एकाने बुस्टर डोस देखील घेतला होता.
कोरोनाच्या दोन रुग्णाचा मृत्यू हा 28 जून रोजी CMC वेल्लोरमध्ये झाला होता. यात 60 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णाला तिरुपतीच्या SVIMS मध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर CMC वेल्लोर येथे हलविण्यात आलं. तिथे RT-PCR टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. दुसरा 43 वर्षीय रुग्णाचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला. त्यांना कोरोना झाल्याचे निश्चित झाल्यावर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते.
एकाने सांगितले की, एका रुग्णाचा छातीचा सीटी स्कॅन केल्यानंतर कोरोना झाल्याचे समजले. त्यानंतर प्रशासनाने सॅनिटायझेशन आणि मृताच्या संपर्कात पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे सुरू केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सीएमसी वेल्लोरमध्ये ज्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्या रुग्णाला मधुमेह, मूत्रपिंडाचा आजार आणि इतर गंभीर आजार होते. दुसऱ्या मृत रुग्णाच्या आरोग्यविषयक नोंदी उललब्ध होऊ शकलेल्या नाहीत. सध्या 4 रुग्णांना कोरोना हा ओमिक्रॉन व्हेरिएन्टमुळे झाला असावा, असा संशय पोलिसांना आहे. या घटनेनंतर मृत रुग्णांचे नमुने हे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठवण्यात आले आहेत. आंध्र प्रदेशात शेवटचा कोरोना रुग्ण हा 2022 मध्ये झाला होता.