टोल नाक्यावर भीषण  स्फोटाचा थरार ! 4 जणांचा मृत्यू;  पाहा VIDEO
टोल नाक्यावर भीषण स्फोटाचा थरार ! 4 जणांचा मृत्यू; पाहा VIDEO
img
Nandini khandare More

टोलनाक्यार  LPG टँकर चा भीषण स्फोट झाला असल्याची घटना घडली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की  या ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

दोन LPG चे टँकर शेजारुन जात असताना एकमेकांना घासले गेले. त्यातला एक टँकर धडकला आणि त्यातून धूर निघू लागला. गॅस लिक झाला आणि दुसरा टँकर पुढे टोलनाका क्रॉस करण्याआधीच त्यात भयंकर स्फोट झाला. ही आग क्षणात टोलनाक्यावर पसरली. यामध्ये होरपळून चार जणांचा मृत्यू झाला तर काही लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून काळजाचा थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

सिहोरी टोल प्लाझावर एक एलपीजी गॅस टँकर नियंत्रणाबाहेर जाऊन थेट डिव्हायडरला धडकला. ही धडक इतकी भयानक होती की, धडक बसताच टँकरमधून गॅस गळती सुरू झाली आणि काही सेकंदांतच तिथे एवढा मोठा स्फोट झाला की संपूर्ण टोल नाका आगीच्या भक्ष्यस्थानी आला. या आगीत टँकर चालकासह टोल नाक्यावर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा आणि अन्य एकाचा, अशा एकूण ४ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.



मिळालेल्या माहितीनुसार, हा टँकर प्रचंड वेगात होता. टोल प्लाझाजवळ पोहोचताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर थेट डिव्हायडरला जाऊन आदळला. धडक एवढी तीव्र होती की टँकरची गॅस टाकी फुटली. गॅस हवेत पसरताच तिथे भीषण आग लागली. या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे

टँकर आणि टोल नाका आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. आकाशात काळ्याकुट्ट धुराचे साम्राज्य पसरले असून, अचानक लागलेल्या या आगीमुळे टोल नाक्यावरील कर्मचारी आणि आजूबाजूचे लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळताना दिसत आहेत. ४ जणांना या आगीतून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group