टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने खळबळ निर्माण झाली असून भिवंडी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून, तीन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. आता या प्रकरणी खलबजानक माहिती समोर आली असून आरोपींनी पेपर किती कोटी रुपयांना विकला गेला याबाबत खुलासा केला आहे.
भिवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 लोक TET चा पेपर विकायला आल्याचे आढळले. त्यांच्याकडे 4 सेट पेपरच आढळले. शिक्षण विभागाने ते पेपर तपासले आणी ते पेपर उद्या होणाऱ्या परिक्षेच्या समान आढळले. यात विशेष तपास पक्षकाची नेमणुक केली आहे. पुढील तपासासाठी पथक रवाना झाले आहे. 1 डिसीपी (पवन बनसोड), 2 एसीपी, 9 पीआए पिएसआय आणि 20 कर्मचारी यांचे मिळुन पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक अधिक तपासासाठी विविध राज्यात रवाना झाले आहे.
पुढे पोलीस म्हणाले की, या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार आहे. त्याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. 2 बिहारी आणी 1 हरियाणाचा आहे. हे दिल्लीतून आल्याची माहिती समोर आली आहे. पेपर कोणाला विकला याची चौकशी सुरु आहे. पेपर विकताना आरोपींनी दीड करोड रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर ते बाकी लोकांना विकणार होते. सर्व शक्यतांना अनुसरुन तपास सुरू आहे. पेपर त्यांनी दिल्लीवरुन आणले असल्याची माहिती मिळाली. आरोपींनी पेपर कोणाला विकले याचे चौकशी सुरु आहे. सकाळी 11 वाजता ट्रॅप लावुन कोणगावमधुन त्यांना ताब्यात घेतले. आरोपींच्या पोलीस कोठडीची आम्ही मागणी केली आहे. एका आरोपीने केद्रिय विद्यायलाची परीक्षा दिली होती आणी तो त्यात नापास झाल्याची माहिती मिळाली आहे.