आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर आली असून उद्या टीईटी परीक्षेचा पेपर होणार होता, मात्र हा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. 2 लाख 26 हजार शिक्षक उद्या टीईटीचा पेपर देणार होते, मात्र आता ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता आगामी काळात या पेपरची नवी तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. या घटनेनं ठाण्यात एकच खळबळ निर्माण झाली आहे.
उद्या होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा प्रशासनाकडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता अधिकृत परिपत्रक जारी करून परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाणार आहे.