तरुणाने उंचावरून  थेट समुद्रात उडी मारली अन...  हनीमूनच्या दिवशीच नको ते घडलं !
तरुणाने उंचावरून थेट समुद्रात उडी मारली अन... हनीमूनच्या दिवशीच नको ते घडलं !
img
Nandini khandare More

हनीमून हा नवजोडप्यांसाठी लग्नानंतरच्या आयुष्यात संपूर्ण आयुष्यासाठीच्या गोड आठवणी बनवणारा एक महत्वाचा क्षण असतो. या साठी जोडप्यांच्या मनात अनेक अशा आकांक्षा असतात. परंतु हाच हनीमून  मात्र एका जोडप्याच्या आयुष्यात वादळ बनून आलं आहे.  ग्रीसमधील समुद्रकिनाऱ्यावर हनीमूनसाठी गेलेल्या या जोडप्याबरोबरही असेच घडले. नव्या नवरीच्या डोळ्यांसमोर तिची संपूर्ण दुनियाच उद्धवस्त झाली आहे.

एका वृत्तानुसार, सुलेमान सरिफे (२७ वर्षे) आपल्या पत्नीसोबत हनीमूनसाठी ग्रीसला गेला होता. हनीमूनच्या तिसऱ्या दिवशी त्याने आपल्या पत्नीसमोरच एका उंच जागेतून समुद्रात उडी घेतली. कातळावर पडल्याने त्याला गंभीर इजा झाली. त्याच्या मानेच्या आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर सुलेमानला तुर्कीच्या फेथिये येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. ११ दिवस तो जीवन आणि मृत्यूशी झुंजत राहिला. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, मात्र ६ जून रोजी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या लग्नाला केवळ दोन आठवड्यांपूर्वी झाले होते

हे कपल लग्नाच्या तिसऱ्या दिवशी हॉटेलमधून निघून फिरायला गेले होते. पती आणि पत्नी म्हणून ते दोघे पण फिरायला निघाले होते. दोघेही एका उंच टेकडीवर पोहोचले होते. ते दोघेही वरुन समुद्र पाहात होते. तेवढ्यात तरुणाने वरुन थेट समुद्रात उडी मारली. पण खाली असलेला दगड त्याने पाहिली नाही. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. ते पाहून त्याच्या पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तातडीने मदत मागितली आणि पतीली रुग्णालयात दाखल केले.

सुलेमान कोण होता?

सुलेमान तुर्गुटलु हा छोट्या कसब्यात लोणचं बनवणाऱ्या कारखान्यात काम करत होता. त्याचे अंतिम संस्कार कुटुक मिनारे मशिदीत करण्यात आले आणि त्यांना अलासेहिर येथील नवीन स्मशानभूमीत दफन करण्यात आले. ही घटना ग्रीसमध्ये एका ब्रिटिश तरुणाने कोणताही विचार न करता समुद्रात उडी मारल्यामुळे झाली. या एका उडीमुळे त्याचा मृत्यू झाला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group