अनेक धक्कादायक आणि विचित्र घटना सध्या घडत असून आता बारामती मधून एक अशीच विचित्र आणि संशयास्पद घटना घडली आहे. शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी प्रियकराने आपल्या प्रेयसीला एक गोळी खाण्यास दिली आणि काही तासांतच तरुणीचा मृत्यू झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. ही घटना बारामतीमध्ये घडली असून मृत तरुणी २३ वर्षाची होती.
बॉयफ्रेंडने शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी तरुणीला गोळी खायला दिली होती. ही गोळी खाल्ल्यानंतर तिचा मृत्यू झाला, असा दावा मृत तरुणीच्या आईने केला आहे. बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेले असता तरुणीने आईला फोन करून तिला गोळी खायला देणार असल्याचे सांगितले होते. याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती शहर पोलिस ठाण्यात तरुणाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुणाचे मृत तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ६ ऑगस्टला ते फिरण्यासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी आरोपीने शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी तिला गोळी खायला दिला होती. तरुणीने मृत्यू होण्यापूर्वी काही तास आधी आईला फोन करून त्याने तिला गोळी दिली असल्याचे सांगितले होते.
त्याच रात्री अचानक तरुणीची प्रकती बिघडली. त्यानंतर तिला वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असताना तरुणाची मृ्त्यू झाला. तरुणाने दिलेल्या गोळीमुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा तरुणीच्या आईने केला आहे. मृत तरुणीच्या आईने पोलिसांना अशी देखील माहिती दिली की, त्यांची मुलगी गेल्या काही दिवसांपूर्वी सतत शांत राहत होती. त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली होती. तिच्या मैत्रिणीकडून आरोपी तिला गोळ्या खायला देत असल्याचे त्यांना कळाले होते.
तरुणीचा उपचादरम्यान मृत्यू झाला खरा पण तिच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय? तिला कोणत्या गोळ्या खायला दिल्या होत्या याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर कारण समोर आली. या प्रकरणाची वैद्यकीय, रासायनिक, डिजिटल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे. तरुणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कारण समोर आले नाही पण सध्या फक्त तर्क वितर्क केले जात आहेत. सध्या बारामती पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.