मुंबई हादरली! महापौरांना बॉम्बस्फोटाची धमकी, प्रशासन अलर्ट
मुंबई हादरली! महापौरांना बॉम्बस्फोटाची धमकी, प्रशासन अलर्ट
img
Nandini khandare More
राज्यातील अनेक बड्या नेत्यांना अनेकदा धमकी मिळाल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्बस्फोटाची धमकीचा मेल आला आहे. त्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या धमकीच्या मेल मध्ये महापौर कार्यालय, मुंबई मेट्रो, शाळा आणि शेअर बाजार उडवण्याची धमकी या मेलमध्ये देण्यात आली आहे. 15 ऑगस्टपूर्वी मुंबईत स्फोट घडवण्याचा दावा करण्यात आला आहे. मेलमध्ये खलिस्तान समर्थनाच्या घोषणा देण्यात आल्या असून काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली आहेत. मुलांना शाळेत पाठवू नका, मेट्रोने प्रवास करू नका, असा इशाराही देण्यात आला आहे. यापूर्वीही महापौरांना दोन वेळा धमकीचे ई-मेल आले होते. धमकीचा मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे. ई-मेलचा आयपी, स्रोत आणि प्रेषकाचा शोध सायबर पोलिसांकडून घेतला जाईल.

रितू तावडे यांचं नाव अलीकडे महापौर बंगल्याच्या वादामुळे चर्चेत होतं. महापौर बंगल्याच्या कामासाठी 2 कोटी 89 लाखाचं टेंडर काढण्यात आल्यामुळे रितू तावडे यांच्यावर आरोप झाले. त्यांच्यावर टीका सुरु होती. या सर्व वादामुळे अखेर रितू तावडे यांनी मुंबई महापालिकेचं ते वादग्रस्त टेंडर मागे घेण्याचे आदेश दिले. “हे काम राणीच्या बागेचं होतं. पण महापौर बंगल्याचा चुकून यामध्ये उल्लेख झाला. या सगळ्यामुळे हे टेंडर मागे घेण्याचे आदेश मी दिलेले आहेत” असं महापौर रितू तावडे यांनी सांगितलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group