मोठी बातमी! रुपाली चाकणकरांच्या जागी महिला प्रदेशाध्यक्षपदावर ''या'' महिला नेत्याची वर्णी
मोठी बातमी! रुपाली चाकणकरांच्या जागी महिला प्रदेशाध्यक्षपदावर ''या'' महिला नेत्याची वर्णी
img
Nandini khandare More
राजकारणातील घडामोडींना वेग आला असून आता अखेर रिक्त महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी महिला नेत्याची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा वैशाली नागवडे यांच्या खांद्यावर सोपवली आहे. अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांच्या पदमुक्तीनंतर रिक्त झालेल्या या पदासाठी नागवडे यांची निवड करण्यात आली. मुंबईतील कार्यक्रमात पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देत नव्या जबाबदारीची घोषणा केली. अजित पवार यांच्या निकटवर्तीय आणि पक्षसंघटनेत सक्रिय नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या वैशाली नागवडे यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादीच्या महिला आघाडीला नवी दिशा आणि बळ मिळेल, अशी पक्षाकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अजित पवारांच्या विश्वासू अन् तळागाळातील नेतृत्व मुळच्या दौंडच्या असलेल्या वैशाली नागवडे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. पुणे ग्रामीण भागात महिला कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभारण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांच्या याच संघटन कौशल्याची दखल घेत अजित पवारांनी यापूर्वी त्यांच्यावर 'महानंदा दूध'च्या अध्यक्षपदाचीही महत्त्वाची धुरा सोपवली होती.

चाकणकरांशी वाद आणि पक्षातील स्थान पक्षात रुपाली चाकणकर यांच्याविरोधात अनेकदा आक्रमक भूमिका घेतल्यामुळे वैशाली नागवडे या सातत्याने राजकीय वर्तुळात चर्चेत राहिल्या होत्या. आता थेट चाकणकर यांच्या जागीच नागवडे यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचे नेतृत्व अधिक आक्रमक आणि बळकट होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group