सध्या राज्यातील राजकरणात मोठ्या घडामोडी घडत असून आता शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह याबाबत मोयही अपडेट सामोर आली आहे.
शिवसेना पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह आणि बंडखोर आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित महत्त्वाच्या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी अपेक्षित होती. मात्र, न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलल्याने आता या प्रकरणावर बुधवारी सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करू शकणाऱ्या या प्रकरणातील पुढील घडामोडी आणि न्यायालयाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या कामकाजादरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्यात या प्रकरणावर चर्चा झाली. मुख्य न्यायमूर्तींनी हे प्रकरण उद्याच्या सुनावणीसाठी घेण्याबाबत विचारणा केली. त्यावर कपिल सिब्बल यांनी याला होकार देत प्रकरण उद्या प्राधान्याने घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली.
यावेळी मुख्य न्यायमूर्तींनी आधी मिसलेनियस प्रकरणे घ्यावी लागतील, असे स्पष्ट केले. त्यानंतर सिब्बल यांनी उद्या थोडा वेळ देण्याची मागणी केली आणि दुपारी २ वाजता प्रकरण घेण्याची विनंती केली. दुपारी २ वाजता वेळ दिल्यास सुनावणी होईल, अन्यथा नेहमीप्रमाणे पुन्हा प्रतीक्षा करावी लागेल, अशी बाजू सिब्बल यांनी मांडली. एका वृत्तानुसार, आता याप्रकरणी बुधवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये न्यायालय काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष असेल.
सुनावणी पुढे ढकलल्याने आज या प्रकरणावर कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. आता बुधवारी होणाऱ्या सुनावणीत न्यायालयीन प्रक्रियेला पुढील दिशा मिळण्याची शक्यता आहे, अशी अपेक्षा आहे.