आंदोलना दरम्यान पंतप्रधानांविषयी अपशब्द वापरणाऱ्या रुचिताची सार्वजनिक माफी !  व्हिडिओ व्हायरल
आंदोलना दरम्यान पंतप्रधानांविषयी अपशब्द वापरणाऱ्या रुचिताची सार्वजनिक माफी ! व्हिडिओ व्हायरल
img
Nandini khandare More
नीट परीक्षेवरून देशात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. या प्रकरणावरून कॉक्रोच जनता पार्टी आक्रमक झाली होती. यावरून सुरु झालेल्या आंदोलनाला देशव्यापी स्वरुप प्राप्त झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या आंदोलनादरम्यान, विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नारेबाजी केली आणि अपशब्द देखील वापरले. अशात रुचिता सिंह नावाच्या एका मुलीने मोदी यांना अपशब्द वापरल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, सुप्रीम कोर्टाचे वकील स्मृती सिंह चंदेल यांनी रुचिता हिच्या विरोधात FIR दाखल केला. पोलीस जेव्हा सेक्टर 18 स्थित रुचिताच्या फ्लॅटवर पोहोचले, तेव्हा ती घरी नव्हती… दरम्यान, शुक्रवारी रात्री रुचिता हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि दोन्ही हात जोडून भारतीयांची माफी मागितली… व्हिडीओमध्ये तिने असा देखील दावा केला की, ती फक्त 15 वर्षांची आहे.

व्हिडीओ पोस्ट करत रुचिता म्हणाली, ‘मी माझ्या मित्रांसोबत कनॉट प्लेस येथे गेलेली. तेथे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु होतं, तेथे अनेक जण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या देत होते… त्या लोकांच्या प्रभावाखाली मी देखील वाईट शब्दांचा वापर केला… मी फक्त 15 वर्षांची आहे… मी जे काही केलं, त्यासाठी मी माफीच्या लायक नाही. मी फार वाईट शब्द वापरले आहेत. ही माझी पहिली आणि शेवटची चूक आहे… त्यानंतर मी असं कधीच करणार नाही… मी पूर्ण देशाची माफी मागते… मला आता इतकी लाज वाटत आहे की, मी माझी नजर देखील वर उचलू शकत नाही. कृपया मला माफ करा…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रुचिता हिची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, यापूर्वी रुचिकाच्या आईने नोएडा पोलीस ठाण्यात पोलिसांकडे लेखी माफीनामा सादर करून आपल्या मुलीला माफ करण्याची विनंती केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रुचिका ही हरियाणातील फरिदाबादची रहिवासी आहे. तिने या वर्षीच्या जानेवारी महिन्यात नोएडामध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता आणि ती एका ब्युटी पार्लरमध्ये काम करते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्या मुलांनी त्यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती त्यांना आपण माफ केल्याचं व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. ती मुले भरकटलेली आहेत आणि त्यांना योग्य मार्ग दाखवणं ही आपली जबाबदारी आहे, असं देखील मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच रुचिका सिंग हिने देखील सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group