गेल्या अनेक दिवसांपासून एफडीएने राज्यभरातकारवाईचा धडाका लावला असून आता थेट मंत्रालयाच्या कँटीनची तपासणी एफडीएकडून करण्यात येणार आहे तसे निर्देशच कोर्टाने दिले आहेत.
मंत्रालयातील कँटीनमध्ये साधा कीटकही आढळला नसल्याचं आज एफडीएने कोर्टात म्हटलं होतं. त्यावर कोर्टाने एफडीएची चांगलीच कान उघाडणी केली आहे. मंत्रालयाच्या कँटीनमध्ये कीटक नाही म्हणणे हस्यास्पद आहे, असं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने आज दुपारपर्यंत मंत्रालयाची कँटीन तपासणीचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे चार वकील आणि एफडीएचे अधिकारी आज मंत्रालयात जाऊन तपास करणार आहेत. त्यानंतर कोर्टात अहवाल देण्यात येणार आहे.