सोने चांदीच्या भावात आज मोठी उसळी !  आजचे वाढलेले भाव किती ?
सोने चांदीच्या भावात आज मोठी उसळी ! आजचे वाढलेले भाव किती ?
img
Nandini khandare More

 गेल्या अनेक दिवसांपासून सोने चांदीच्या भावात मोठा चढ  उतार होताना दिसत आहे. काही दिवसांआधी कोसळलेल्या भावाने मात्र आता मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी आता सोने खरेदी करणे शक्य नसल्याचेच चिन्ह दिसतंय. 

आज अचानक सोने आणि चांदीच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना खरेदी करताना विचार करावा लागणार आहे. आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आता खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे. 22 जुलै रोजी सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे एक तोळा सोन्याची किंमत  जीएसटीसह 1 लाख 49 हजार 350 रुपयांवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात तब्बल 5 हजारांची वाढ झाली आहे. त्यामुळे जीएसटीसह चांदीचे दर 2 लाख 36 हजार 900 रुपयांवर पोहोचले आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group