''या'' तीन मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन
''या'' तीन मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन
img
Nandini khandare More

दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू असून हे आंदोलन आता चिघळलं आहे. हे आंदोलक नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासासह प्रमुख तीन मागण्यांसाठी सीजेपी रस्त्यावर उतरली आहे. हजारो आंदोलकांची गर्दी आंदोलनासाठी जमली, अशात जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. 

कॉकरोच जनता पार्टीने तीन मोठ्या मुद्द्यांच्या विरोधात केलं आहे आंदोलन

1. नीट परीक्षेमध्ये झालेला गैरप्रकार, प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील अनियमिततांबाबत चौकशी व जबाबदारी निश्चित करण्याची मागणी.

2. परीक्षेत झालेल्या मोठ्या प्रमाणावरील गैरप्रकारांमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

3. देशातील वाढती बेरोजगारी, सरकारी भरती परीक्षांच्या निकालांमधील विलंब आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत मांडलेला खेळ… या मुद्द्यांवर सरकारला घेरण्यात आलं आहे.

दरम्यान डीसीपी सचिन शर्मा यांनी सांगितल्यानुसार, पावसाळी अधिवेश आणि आंदोलनाची तिव्रता पाहता दिल्लीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता लागू करण्यात आली आहे. या कायद्याअंतर्गत, पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमा होऊ शकत नाहीत, विरोध किंवा आंदोलन करु शकत नाहीत. याकाळात धरणे आंदोलनं करण्यावर पूर्ण बंदी असेल. केवळ जंतर-मंतर येथेच शांततापूर्ण निदर्शनांना परवानगी देण्यात आली असून त्यासाठीही पूर्वपरवानगी घेणं देखील आवश्यक असणार आहे. असं देखील सांगण्यात आलं आहे… जर कोणी आदेशांचं उल्लंघन केलं तर, त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल…
इतर बातम्या
Join Whatsapp Group