धाराशिवच्या ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यात हृदयद्रावक घटना घडली. कुस्ती खेळाडू असलेल्या अश्विनी मनोहर पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांना घेऊन किल्ल्यातील 100 फूट खोल दरीत उपळी बुरुजावरून उडी घेतली. या घटनेनं क्रीडा विश्वाला धक्का बसलाय.
या घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा मृत्यू झाला. अडीच वर्षांच्या दुसऱ्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि एका मुलीवरती धाराशिव येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अश्विनी पौळ या तीन मुलांसह नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी ही घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली.अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांती नावाच्या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जुळ्या मुलींपैकी असलेली वीर गंभीर जखमी आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.
त्यातच अश्विनी यांच्या वडिलांनी गंभीर आरोप केले. पोलिस या घटनेची चाैकशी करत आहेत. अश्विनी याच नाही तर त्यांचे वडील, भाऊ, आई आणि बहिणी देखील कुस्तीपटू आहेत.
अश्विनी पौळ ह्या एमएसएफमध्ये त्या नोकरीसाठी होत्या. त्यांचे पती मनोहर हे रिक्षाचालक होते. पतीच्या सांगण्यावरून त्यांनी काही महिन्यांपूर्वीच राजीनामा दिला. तीन महिन्यांपासून त्या आपल्या तीन लेकरांसोबत राहत होत्या. माहेरी आपल्या लेकरांना घेऊन त्या आल्या होत्या आणि माहेरीच राहत होत्या.
दरम्यान , त्यांच्या वडिलांनी यादरम्यान बोलताना त्यांच्या सासरच्या लोकांवर आरोप केले. अश्विनी पौळ गेल्या काही दिवसांपासून मानसिक त्रासात होत्या. सासरच्या लोकांकडून त्यांना त्रास दिला जात होता. दरम्यान , अश्विनी पौळ यांनी असा निर्णय काय घेतला हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही. नळदुर्ग पोलिसांकडून तपास सुरू आहे.