मराठा आरक्षणाबाबत  गिरीश महाजनांनी  केला ''हा''  मोठा दावा !
मराठा आरक्षणाबाबत गिरीश महाजनांनी केला ''हा'' मोठा दावा !
img
Nandini khandare More
राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा तापला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले असून या उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे राज्यातील नेत्यांकडून त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

दरम्यान आता महाराष्ट्र सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील 90% मागण्या पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, सरकार या प्रकरणात अत्यंत सकारात्मक भूमिका घेत आहे आणि अनेक योजना मराठा समाजाच्या हितासाठी लागू केल्या आहेत.

जरांगे पाटलांनी आपले उपोषण मागे घेऊन तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन महाजन यांनी केले. अनेक लोकांना कुणबी प्रमाणपत्रे दिली गेली असून, काही मोजक्या प्रकरणांमध्येच वैधतेला नकार दिला गेला आहे. पूर्वीही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा आरक्षण दिले होते, परंतु दुर्दैवाने ते टिकू शकले नाही.

महाजन यांनी जल व्यवस्थापनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या जलमंथन बैठकीबद्दलही माहिती दिली. तसेच, तापी पुनर्भरण (मेघा रिचार्जर) प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. जल जीवन मिशनमध्ये काही ठि
इतर बातम्या
Join Whatsapp Group