मोठी बातमी ! मराठा आंदोलक थेट मंत्र्याच्या गाडीखाली शिरला ; एकच खळबळ
मोठी बातमी ! मराठा आंदोलक थेट मंत्र्याच्या गाडीखाली शिरला ; एकच खळबळ
img
Nandini khandare More
 मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ते पुन्हा आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. हे निर्णायक उपोषण असेल असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला आहे. जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही मुंबईला धडक देणार असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 

दरम्यान , आता याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड येथे रास्तारोको करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे सोलापुरातून देखील एक मोठी बातमी समोर आली आहे.

सोलापूरच्या माढामध्ये मराठा आंदोलकाने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची गाडी अडवली आहे. धावत्या गाडीमागे पळत जाऊन या आंदोलकाने बाबासाहेब पाटील यांच्या गाडीखाली घुसण्याचा प्रयत्न केला.  बापू गायकवाड असं या मराठा आंदोलकाचं नाव आहे. त्याने सहकार मंत्र्यांच्या धावत्या गाडीचा पाठलाग केला, त्यानंतर तो थेट गाडीखाली घुसला त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील देण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकाला गाडीखालून ओढत बाहेर काढले.  आंदोलकाला बाहेर काढण्यात आल्यानंतर बाबासाहेब पाटील यांचा ताफा तुळजापूरच्या दिशेनं रवाना झाला आहे. दरम्यान जेव्हा ही घटना घडली तेव्हा बाबासाहेब पाटील हे आपल्या वाहनातच होते, मात्र ते खाली न उतरता वाहनातच बसून राहिल्याचं पहायला मिळालं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group