5 मुहूर्तात कधीही बांधा राखी ! कोणती वेळ टाळावी ?
रक्षाबंधनचा शुभ सण आहे.आज राखी बांधण्याच्या मुहुर्त नेमका कोणता हे जाणून घेऊ. वैदिक पंचांगानुसार, यावर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी चंद्रग्रहण देखील होणार आहे. त्यामुळे 28 ऑगस्ट रोजी राखी बांधण्यासाठी शुभ वेळ, महत्त्व जाणून घ्या....
रक्षाबंधनासाठी शुभ वेळ कोणती आहे?
हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असलेला रक्षाबंधन हा सण आज, 28 ऑगस्ट रोजी मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल. भाऊ-बहिणींमधील प्रेम, आदर आणि संरक्षणाचे प्रतीक असलेल्या या सणाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात. आपल्या भावांचे आयुष्य सुखी आणि यशस्वी राहावे या इच्छेने बहिणी राखी बांधतात. यावर्षी रक्षाबंधनासाठी शुभ वेळ कोणती आहे? ग्रहणाच्या वेळी राखी बांधावी का? राखी बांधण्याची योग्य वेळ कोणती आहे? जाणून घ्या....
रक्षाबंधन - राखी बांधण्याचे शुभ मुहूर्त
सर्वोत्तम वेळ: सकाळी 5:57 ते 9:48 पर्यंत
दुसरी शुभ वेळ: सकाळी 7:33 ते 9:10 पर्यंत
तिसरी शुभ वेळ: सकाळी 9:10 ते 10:46 पर्यंत
अभिजीत मुहूर्त: दुपारी 12:14 ते 1:05 पर्यंत
गोधुली मुहूर्त: सायंकाळी 6:57 ते 7:19 पर्यंत
चंद्रग्रहणाची वेळ आणि त्याचे परिणाम?
वैदिक पंचांगानुसार, या वर्षी, शुक्रवार, 28 ऑगस्ट 2026 रोजी चंद्रग्रहण होत आहे. त्यामुळे, ग्रहणाच्या वेळी रक्षाबंधन साजरे करावे की नाही याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. लक्षात घ्या की चंद्रग्रहण सकाळी 6:53 वाजता सुरू होईल आणि दुपारी 12:31 पर्यंत चालेल. हे या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आहे, जे खंडग्रास असेल. शिवाय, हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे, येथे सुतकाचे नियम लागू होणार नाहीत. अशा परिस्थितीत, ग्रहणाचा रक्षाबंधन सणावर कोणताही परिणाम होणार नाही.
राहुकाळाची वेळ
वैदिक पंचांगानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी, राहुकाळ सकाळी 10:31 वाजता सुरू होईल आणि दुपारी 12:07 पर्यंत चालेल. या काळात राखी बांधणे टाळण्याचा सल्ला दिला जातो..