बॉलिवूडच्या 'या'  प्रसिद्ध रॅपरने ५ महिन्यातच  घेतला घटस्फोट
बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध रॅपरने ५ महिन्यातच घेतला घटस्फोट
img
Nandini khandare More

सिने इंडस्ट्रीमधून एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह आणि त्याची पत्नी ईशा रिखी यांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटाची बातमी समोर आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

विशेष म्हणजे, या दोघांनी मार्च २०२६ मध्येच जवळच्या नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत खासगी पद्धतीने लग्न केलं होतं. लग्नाला अवघे पाच महिने होत असतानाच त्यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह  हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा प्रचंड चर्चेत आला आहे. पत्नी ईशा रिखीशी झालेले त्याचे मतभेदामुळे चाहते तर हैराण झाले. त्या दोघांनीही परस्परसंमतीने वेगळं होण्याचा निर्णयही जाहीर केला. याबद्दल बादशाह यानेच एक पोस्ट केली होती. अवघ्या 5 महिन्यांपूर्वी बादशाह आणि ईशा यांचं लग्न झालं होतं. सोशल मीडियावर त्यांनी तशी जाहीर घोषणाही केली होती. मात्र त्यानंतर एवढ्याशा काळात दोघांमध्ये आलेला दुरावा आणि त्यांनी नातं तोडण्याचा घेतलेला निर्णय यामुळे चाहते चांगलेच निराश झाले.

सोशल मीडियावर एकमेकांना केलं अनफॉलो

एवढंच नव्हे तर बादशाह आणि ईशा रिखी या दोघांनी सोशल मीडियावर, इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं. एवढंच नव्हे तर ईशाने आणखी एक मोठं पाऊल उचललं. तिने तिच्या प्रोफाईलवरून बादशाहशी निगडीत सर्व जुन्या पोस्ट्स आणि फोटोही हटवले. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यात दोघांनी उचललेल्या या पावलामुळे त्यांचे मतभेद तर सार्वजनिक झालेच, पण सोशल मीडियावरही विविध चर्चांना उधाण आलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group