लाडक्या बहिणींना गौरी आगमनाच्या मुहूर्तावर ₹1500 मिळणार? काय आहे अपडेट  ?
लाडक्या बहिणींना गौरी आगमनाच्या मुहूर्तावर ₹1500 मिळणार? काय आहे अपडेट ?
img
Nandini khandare More

लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. अशामध्ये याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. सरकार लाडक्या बहिणींचा गणेशोत्वस सण गोड करण्याच्या तयारीत आहेत. लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये गौरी-गणपती सणात मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर महिना सुरू झाला तरी देखील लाडकींना ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये मिळाले नाहीत. त्यामुळे ते पैसे कधी येणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. अशामध्ये लाडकींना गौरी-गणपती उत्सवादरम्यान आर्थिक मदत मिळेल असा अंदाज आहे. कारण सरकारने नेहमी सणाचे औचित्य साधून लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जाम केले आहेत. त्यामुळे यावेळी देखील गणेशोत्सवात लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये १६ सप्टेंबरनंतर मिळण्यास सुरूवात होईल असा अंदाज आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group