महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने हा प्रश्न अधीकच गंभीर होत चालला आहे. दरदिवशी कुठे ना कुठे महिला अत्याचाराच्या घटना घडत असल्याचं ऐकायला मिळत आहे. दरम्यान आता नवी दिल्लीत एका १६ वर्षीय विद्यार्थिनीवर स्लीपर बसमध्ये सामूहिक अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार , काश्मिरी गेट परिसरातील एका स्लीपर बसमध्ये ही घटना घडली असून, या प्रकरणात बसच्या चालक आणि वाहकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्याची रहिवासी आहे.
या घटनेने राष्ट्रीय राजधानीतील सार्वजनिक वाहतुकीत महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या व्यक्तींकडूनच असे कृत्य घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
तेल मंत्रालयाने कळवले आहे की, जर तुम्ही तुमचे ई-केवायसी पूर्ण करण्यात अयशस्वी झालात, तर तुमचे एलपीजी सिलिंडर कनेक्शन तात्पुरते निलंबित केले जाईल.
इतकेच नाही, तर ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे तुम्हाला घरगुती दरात एलपीजी सिलिंडर खरेदी करता येणार नाहीत. अनेक अहवालांनुसार, जे एलपीजी ग्राहक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात अयशस्वी ठरतील, त्यांना त्यांचे घरगुती एलपीजी सिलिंडर व्यावसायिक दरात खरेदी करावे लागू शकतात.