नेपाळच्या भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या महाप्रलयाने होत्याच नव्हतं करून सोडलं असून अजूनही नेपाळ वर संकट कायम असून हजरो लोक बेपत्ता असून शकेडो लोकं मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान आता या प्रलयाचाकहराची भयन्कर अपडेट समोर आली आहे.
महापुरामुळे अति भयानक विध्वंस घडवून आणला आहे. मानवतेला हादरवून सोडणारा असा हा महाभयानक विध्वंस आहे. या जलप्रलयात 626 लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि चीनसहीत अनेक देशांचे नागरिक अद्यापही सापडत नाहीयेत. त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे. जे लोक बेपत्ता झाले आहेत, त्यांच्या बाबतचे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. नेपाळमधील नद्यांमधून प्रेते वाहून जात आहेत. भारतात ही प्रेते वाहून येत असल्याने खळबळ उडाली आहे. कधीच पाहिलं नाही असं दृश्य पाहायला मिळताना दिसत आहे.
उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील गंडक नदीत तीन मृतदेह वाहून आले आहेत. हे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे तिन्ही मृतदेह नेपाळमधून वाहत आले आहेत. अधिकाऱ्यांनीही त्याची पुष्टी केली आहे. हे तिन्ही मृतदेह बॅराज पियर 3 येथे मिळाले आहेत. या मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. कुशीनगरच्या खड्डा एरियात हे मृतदेह आढळले. खड्डा विभागाचे एसएचओ संदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉनिटरिंग टीमला हे मृतदेह वाहत असल्याचं दिसलं. त्यामुळे तात्काळ बाहेर काढण्यात आले. त्याची पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली.
या मृतदेहांची ओळख पटावी म्हणून त्याची माहिती नेपाळला देण्यात आली आहे. मात्र, या मृतदेहांची तात्काळ ओळख पटू शकलेली नाही. मृतदेहच नाही तर गंडक नदीत सिलेंडर, गाड्या, घरातील महत्त्वाच्या वस्तू व इतर सामान वाहून भारतात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.