बायकोच्या चारित्र्यावर संशय ! नवऱ्याकडून बेदम मारहाण अन... घराच्या आतील चित्र पाहून सर्वच जण हादरले
बायकोच्या चारित्र्यावर संशय ! नवऱ्याकडून बेदम मारहाण अन... घराच्या आतील चित्र पाहून सर्वच जण हादरले
img
Nandini khandare More

अलीकडे गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ  झाली असून पती- पत्नीच्या वादातून , एकमेकांवरील संशयावरून अनेक गंभीर असे गुन्हे घडत असून आता  अशीच घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. 

बुलडाण्यामध्ये नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. चारित्र्याच्या संशयातून त्याने बायकोला संपवलं. बुलडाण्याच्या खामगाव शहरातील गोपाल नगर परिसरात ही घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून आरोपी सतत बायकोसोबत वाद घालायचा. याच रागातून त्याने बेसबॉल स्टिकने मारहाण करत बायकोची हत्या केली.

चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केली. बेसबॉल स्टिकने बेदम मारहाण करत आरोपीने बायकोला जागीच संपवलं. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या. गणेश डाबेराव असं आरोपीचे नाव आहे. त्याने बायकोची हत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास गणेश डाबेरावच्या घरातून अचानक मोठ्याने आरडाओरडा केल्याचा आणि भांडणाचा आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी त्याच्या घरासमोर मोठी गर्दी केली. यावेळी जमलेल्या नागरिकांनी आरोपीला काय झाले असं विचारलं असता त्याने माझ्या बायकोचे कुणासोबत तरी लफडं आहे त्यामुळे मी तिला संपवलं असं सांगितलं. त्यामुळे सर्वांना धक्का बसला

आरोपीच्या घराच्या आतील चित्र पाहून सर्वजण घाबरले. रक्ताच्या थारोळ्यात त्याची बायको पडली होती. त्यानंतर नागरिकांनी घटनेची माहिती फोन करून शिवाजीनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत आरोपीला अटक केली. आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group