मनोरंजन विश्वाला आणखी एक मोठा धक्का ! ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांचे  निधन
मनोरंजन विश्वाला आणखी एक मोठा धक्का ! ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांचे निधन
img
Nandini khandare More
मनोरंजन विश्वाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधू कांबीकर यांचे पुण्यात निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या दमदार अभिनयाने आणि लावणीच्या खास शैलीने त्यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. चित्रपटांमध्ये आई, सासू अशा विविध भूमिका साकारत त्यांनी मराठी मनोरंजनविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, एका लावणीच्या कार्यक्रमादरम्यान आलेल्या पक्षाघाताच्या झटक्यानंतर त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले.

लावणीच्या कार्यक्रमादरम्यान आला पक्षाघाताचा झटका २७ नोव्हेंबर २०१६ रोजी मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात ‘लावण्य संगीत’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तब्बल १२ वर्षांनंतर मधू कांबीकर या कार्यक्रमातून पुन्हा लावणी सादर करत होत्या. मात्र, कार्यक्रमादरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी जिद्दीने भैरवी सादर केली. पण, त्यानंतर त्यांना मेकअप रूममध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group