राजकारणात हळहळ ! काँग्रेसच्या ज्येष्ठ दिग्गज महिला नेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
राजकारणात हळहळ ! काँग्रेसच्या ज्येष्ठ दिग्गज महिला नेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
img
Nandini khandare More
राजकरणातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या ज्येष्ठ दिग्गज महिला नेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मध्य प्रदेशच्या उज्जैन येथील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि नगरसेविका माया त्रिवेदी यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 58 वर्षांच्या होत्या. माया त्रिवेदी यांनी तीन वेळा काँग्रेसच्या नगरसेविका म्हणून काम केले होते. तसेच त्यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूकही लढवली होती. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

माया त्रिवेदी या उज्जैन शहरातील कार्तिक चौक परिसरात राहत होत्या. त्या प्रभाग क्रमांक 21 मधून सलग तिसऱ्यांदा काँग्रेसच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्या काँग्रेस नेते पंडित राजेश त्रिवेदी यांच्या पत्नी होत्या. ब्राम्हण समाजतही त्यांचा मोठा प्रभाव होता.

मिळालेल्या महितीनुसार, मंगळवारी रात्री जेवण केल्यानंतर काही वेळातच माया त्रिवेदी यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्यांना वाचवता आले नाही. त्यांच्या निधनाची बातमी समजताच काँग्रेसचे नेते आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी त्यांचे कार्यक्रम रद्द करत त्यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले. माया त्रिवेदी यांची अंत्ययात्रा बुधवारी सकाळी ११ वाजता कार्तिक चौक येथील निवासस्थानातून निघाली होती. शिप्रा नदीच्या तीरावरील चक्रतीर्थ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group