हल्ली गुन्ह्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून अतिशय किरकोळ वादातून सुद्धा गंभीर असे गुन्हे घडत आहेत. दरम्यान आता एका तरुणाचा मित्रच टायचा काळ बनून आला अन त्याने तरुणाचा जीवाचं घेतला असल्याची घटना उघडकीस आली आहे.
नाशिकच्या सुरगाणा येथून सापुतारा येथे सहलीसाठी गेलेल्या मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. याच वादातून एका तरुणाची मित्रानेच निर्घृण हत्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सापुतारा येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरगाणा येथून सापुतारा येथे सहलीसाठी गेलेल्या मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हिंसक संघर्षात होऊन एका मित्राने दुसऱ्या मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला करत त्याचा निर्घृण खून केला आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या थरारक घटनेमुळे सुरगाणा आणि सापुतारा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरगाणा येथील ६ मित्रांचा गट पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी सापुतारा येथे गेला होता. सर्व मित्र एकत्र असताना दोन मित्रांमध्ये अचानक कोणत्या तरी किरकोळ कारणावरून बाचाबाची सुरू झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, एका मित्राने रागाच्या भरात खिशातून चाकू काढून दुसऱ्यावर वार केले.
या चाकू हल्ल्यात हेमंत सूर्यवंशी हा तरुण गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर खून करणारा आरोपी कुणाल परदेशी याला सापुतारा पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
इतर सर्व मित्र पोलिसांच्या ताब्यात
सापुतारा पोलिसांनी मुख्य आरोपी कुणाल परदेशी याच्यासह सोबत गेलेल्या इतर सर्व मित्रांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला? यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? तसेच घटनेच्या वेळी नक्की काय घडलं? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. सहलीला गेलेल्या मित्रांमधील या रक्तरंजित घटनेमुळे मयत तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.