शिक्षण क्षेत्रात शोककळा ! मराठी भाषा आणि व्याकरण क्षेत्रातील जेष्ठ अभ्यासक यास्मिन शेख यांचे निधन
शिक्षण क्षेत्रात शोककळा ! मराठी भाषा आणि व्याकरण क्षेत्रातील जेष्ठ अभ्यासक यास्मिन शेख यांचे निधन
img
Nandini khandare More
मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासिका, लेखिका आणि शिक्षिका प्रा. डॉ. यास्मिन शेख यांचे आज सोमवारी (24 ऑगस्ट) सकाळी पुण्यातील एका वृद्धाश्रमात वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 101 वर्षांच्या होत्या. 21 जून रोजी त्यांनी 102व्या वर्षात पदार्पण केले होते. त्यांच्या निधनाने मराठी भाषा आणि व्याकरणाच्या क्षेत्रातील एक समर्पित व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलंय. त्यांच्या पश्चात डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना या दोन मुली आहेत.

त्यांचा निधनाने मराठी भाषा आणि व्याकरण क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. यास्मिन शेख यांना नुकत्याच झालेल्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नांदी संमेलनात सन्मानित करण्यात आले होते. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्या या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या नव्हत्या.

मराठी भाषेच्या अभ्यास आणि संवर्धनासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. बालभारतीच्या मराठी विषयाच्या पाठपुस्तकांचे इतर सदस्यांच्या सहकार्याने त्यांनी तब्बल 7 वर्षे संपादन केले होते. त्यांच्या पश्च्यात दोन मुली आहेत. डॉ. शमा आणि प्रा.रुकसाना असा त्यांचा परिवार आहे. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group