राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक दुर्दैवी घटना घडत असून आता नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरमधील गोधणी परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास क्लोरिन वायूची भीषण गळती झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. मध्यरात्री अंदाजे १२:१५ वाजताच्या सुमारास जलशुद्धीकरण केंद्रात ही गॅस गळती सुरू झाली.
गोधणी नगरपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात (वाटर ट्रिटमेंट प्लांट) अचानक क्लोरिन गॅस लीक झाल्याने परिसरातील नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना तीव्र श्वासोच्छवासाचा त्रास सुरू झाला. या घटनेत प्रकल्पामधील ८ ते १० कर्मचाऱ्यांसह परिसरातील २० ते २५ नागरिक, अशा तब्बल ४० जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हवेत गॅस पसरल्याने लोकांना अचानक दम लागणे, डोळ्यांची जळजळ होणे आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला. बाधित ४० जणांपैकी ४ ते ५ नागरिकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात आले असून इतरांवर सामान्य कक्षात उपचार सुरू आहेत.
रात्रीपासून NDRF आणि पोलिसांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलीस, अग्निशमन दल आणि NDRF (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) च्या पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्रीपासूनच पोलिसांनी परिसरात रेस्क्यू ऑपरेशन राबवून बाधित नागरिकांना रुग्णालयात पोहोचवले, तर इतरांना सुरक्षित स्थळी हलवले. गॅस न्यूट्रलाईज करण्यासाठी एनडीआरएफचे पदाधिकारी विशेष सेफ्टी सूट (PPE Kit) घालून ३ ते ४ वेळा प्लांटच्या आत जाऊन आले आहेत. गॅस गळती रोखण्याचे आणि ती पूर्णपणे निष्प्रभ करण्याचे काम अजूनही युद्धपातळीवर सुरू आहे.