दूधाच्या पुरवठ्यावर टांगती तलवार! तुकाराम मुंढेंच्या निर्णयाने वाढली चिंता
दूधाच्या पुरवठ्यावर टांगती तलवार! तुकाराम मुंढेंच्या निर्णयाने वाढली चिंता
img
Nandini khandare More
अन्न व औषध प्रशासनव विभागाकाकडून सध्या भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढणे सुरु असून FDA विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या जोरदार चर्चेत आहेत. तुकाराम मुंढे यांच्याकडे हे पद येताच त्यांनी सर्वत्र धाडी टाकायला सुरुवात केली आहे. आता यानंतर दूधाबाबत एक प्रकार समोर आला आहे. 

सरकारी आकडेवारीनुसार, भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असून, येथील एकूण उत्पादन 248 दशलक्ष टन आहे. दरम्यान,  दुधाचा देशांतर्गत वापर आणि मागणी सुमारे 240 दशलक्ष टन असण्याचा अंदाज आहे. याचा अर्थ असा की, दूध उत्पादनाचा मोठा भाग दुधाच्या स्वरूपातच वापरला जातो. प्रश्न असा निर्माण होतो की, हॉटेल्स, मिठाईची दुकाने, चहाची दुकाने, अन्न प्रक्रिया उद्योग आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये वापरले जाणारे दूध येते कुठून? तर भेसळीच्या दैनंदिन घटनांवरून हे स्पष्टपणे दिसून येते की, देशात मोठ्या प्रमाणावर भेसळीचा व्यापार अव्याहतपणे सुरू आहे.

या व्यापारात केवळ भेसळयुक्त दूधच नव्हे, तर भेसळयुक्त चीज, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचाही समावेश आहे. पुरवठा आणि मागणी यांच्यातील प्रचंड ताण, तसेच अधिक नफ्याची लालसा, यामुळे भेसळ करणाऱ्यांना मार्ग मोकळा झाला आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. आता भेसळ जर थांबवली तर खऱ्या अर्थाने भारतात दूधाचा पुरवठा कमी होईल .

देशातील दूध उत्पादन आणि वापराचे गणित 1950 मध्ये 17 दशलक्ष टन असलेले उत्पादन 2025 मध्ये 247 दशलक्ष टनांपेक्षा जास्त झाले. 2024-25 मध्ये ते 247.87 दशलक्ष टन होते, म्हणजेच अंदाजे 247.9 दशलक्ष टन. हे 2023-24 मधील 239.30 दशलक्ष टनांपेक्षा 3.58% जास्त आहे. दरडोई दुधाची उपलब्धता दररोज 485 ग्रॅम होती.

जरी सरकार दरवर्षी उत्पादनाप्रमाणे एकूण वापराची स्वतंत्र आकडेवारी जाहीर करत नसले तरी, उपलब्ध अधिकृत घरगुती वापर खर्च सर्वेक्षणानुसार 2023-24 मध्ये ग्रामीण भागात दरडोई सरासरी मासिक दूध वापर 5.085 लिटर आणि शहरी भागात दरडोई 5.686 लिटर होता. हे अंदाजे दररोज प्रति व्यक्ती 170-190 मिली इतके होते. यामध्ये हॉटेल्स, मिठाईची दुकाने, चहाची दुकाने, अन्न प्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या दुधाचा समावेश नाही.

कोणत्या राज्यात किती दुधाचा वापर?

पंजाब, राजस्थान आणि हरियाणा येथे सर्वाधिक दुधाचा वापर होतो. पंजाबमध्ये दरडोई सरासरी दैनिक दूध वापर 1245 ग्रॅम आहे, तर राजस्थानमध्ये तो 1171 ग्रॅम आहे. हरियाणात, एक सामान्य व्यक्ती दररोज 1105 ग्रॅम दुधाचे सेवन करते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group