गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या पालकमंत्री पदावरून निर्माण झालेला तिढा सुटला असून नाशिक मधून मोठी बातमी समोर येत आहे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांची नावं आज शासनाकडून जाहीर करण्यात आली आली आहेत. नाशिकमध्ये गिरीश महाजन , तर रायगडमध्ये भरत गोगावले यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू होती, अखेर यामध्ये शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली आहे. भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री झाले असून, नाशिकची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने आदिती तटकरे या उत्सुक होत्या, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भरत गोगावले हे उत्सुक होते. त्यामुळे अद्यापपर्यंत रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय झाला नव्हता. परंतु आता भरत गोगावले यांनी बाजी मारली असून, रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. 15 ऑगस्टला भरत गोगावले यांनीच ध्वजारोहण केलं होतं.