''या'' शहरात मोठी खळबळ ! शाळा, जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची ईमेलद्वारे धमकी
''या'' शहरात मोठी खळबळ ! शाळा, जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची ईमेलद्वारे धमकी
img
Nandini khandare More
नागपूरमधून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. . शहरातील एका प्रतिष्ठित शाळेसह जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ई-मेल प्राप्त झाल्याने प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली. धमकीचा संदेश मिळताच संबंधित परिसराची तपासणी सुरू करण्यात आली असून, या प्रकारामुळे पालक आणि नागरिकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे.
 
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू करत संबंधित ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवली. धमकीची माहिती मिळताच बॉम्ब शोध आणि नाशक पथकाला तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या पथकांनी शाळा आणि जिल्हा न्यायालय परिसराची कसून तपासणी केली. विद्यार्थ्यांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन परिसरातील प्रत्येक संशयास्पद वस्तूची तपासणी करण्यात आली. मात्र, प्राथमिक तपासणीत अद्याप कोणतीही स्फोटक वस्तू किंवा संशयास्पद साहित्य आढळून आलेले नाही. 

दरम्यान, धमकीच्या ई-मेलमध्ये शाळांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा विद्यार्थ्यांवर प्रभाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या आरोपांची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. त्यामुळे ई-मेलमागील नेमका उद्देश काय होता, याबाबतही पोलिसांकडून तपास केला जात आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सायबर पोलिसांनीही तपास सुरू केला आहे. धमकीचा ई-मेल नेमका कुठून पाठवण्यात आला आणि या मागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेतला जात आहे. ई-मेलचा तांत्रिक तपशील, पाठवणाऱ्याची माहिती आणि संबंधित डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. 

एकाच वेळी अनेक शाळा आणि जिल्हा न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना धमकी मिळाल्याने पालक, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. धमकी खरी होती की केवळ दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या पोलिस आणि सायबर पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी विविध पातळ्यांवर तपास सुरू आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group