हाय-प्रोफाइल पार्ट्यांमध्ये बायका-गर्लफ्रेंड्सची अदलाबदल ? अभिनेत्रीच्या दाव्याने खळबळ
हाय-प्रोफाइल पार्ट्यांमध्ये बायका-गर्लफ्रेंड्सची अदलाबदल ? अभिनेत्रीच्या दाव्याने खळबळ
img
Nandini khandare More

मुंबईत होणाऱ्या हाय-प्रोफाइल पार्ट्यांबद्दल एका अभिनेत्रीने खळबळजनक दावा केला आहे. एका मुलाखतीत टीव्ही अभिनेत्री आचल खुराना हिने मुंबईच्या हाय प्रोफाईल पार्ट्यांची पोलखोल केली आहे. अभिनेत्रीने असा दावा केला की, सिनेसृष्टीतील काही पार्ट्यांमध्ये अमली पदार्थ, ‘कास्टिंग काउच’ आणि जोडीदार बदलणे (पार्टनर-स्वॅपिंग) यांसारख्या गोष्टी घडतात.

‘गेल्या 10 – 15 वर्षांपासून जेव्हा माझी पार्टी करण्याची इच्छा होते, तेव्हा मी माझ्या भावंडांकडे किंवा माझ्या कुटुंबियांकडे जाते. मुंबईत पार्टी करण्याऐवजी मला माझ्या कुटुंबियांसोबत वेळ व्यतीत करायला अधिक आवडेल. कुटुंबियांसोबत मला चिल करायला ड्रिंक करायला आवडतं.’ अभिनेत्रीने सांगितलं की, मुंबईत तिने कधीच फारसे मित्र बनवले नाहीत, कारण येथील ‘पार्टी कल्चर’ आचलला भयंकर वाटतं. असं आभाळ म्हणाली आहे. 

मुंबईतील ग्लॅमरस मनोरंजन क्षेत्रातील जीवनशैली आणि पार्ट्यांबाबतच्या अनुभवांच्या आधारे आचलने अनेक गंभीर दावे केले आहेत. अभिनेत्रीने सांगितलं, अशा पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचा वापर केला जातो आणि ‘कास्टिंग काउच’सारखे प्रकारही घडतात. आचल हिने असाही दावा केला की, काही पार्ट्यांमध्ये पत्नी किंवा प्रेयसींची अदलाबदल देखील केली जाते. मात्र, आचलने हेही स्पष्ट केलं की, असं करण्यासाठी कोणावर दबाव नसतो, सर्वकाही प्रत्येकांच्या इच्छेने होत असतं.

पुढे आचल असं देखील म्हणाली की, सोशल मीडियावर आपल्या लग्नाबाबत आणि नातेसंबंधांबाबत ‘कपल गोल्स’ देणारे काही सेलिहब्रिटी कपल्स खरं तर त्यांच्या जोडीदाराची फसवणूक देखील करत असतात. त्यामुळे मला अशा नकारात्मकतेपासून दूर राहायला आवडतं… पडद्यामागे या सेलिब्रिटींचं आयुष्य फार वेगळे असतं… असं देखील आचल म्हणाली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group