अवघ्या एक महिन्यावर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे आता ग्राहकांची सोने खरेदीची लगबग सुरु झाली आहे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या वाढत भाव बघता सोन खरेदी करणं सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेले होते. दरम्यान आत मात्र एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आज काहीशी दिलासादायक बातमी आहे. सराफा बाजार उघडताच आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आगामी सण तसेच लग्नसराईसाठी सोने खरेदी करण्याची तयारी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज १ तोळे म्हणजेच १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ४९ हजार ५७० रुपये इतका आहे. गेल्या काही दिवसांतील सोन्याच्या दरातील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर आज दर स्थिर राहिल्याने ग्राहकांना खरेदीसाठी काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, चांदीच्या दरातही सध्या कोणताही विशेष बदल झालेला दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून चांदीचा भाव २३ हजार ५०० रुपये इतका स्थिर आहे. सणासुदीचा काळ आणि लग्नसराई जवळ येत असल्याने बाजारात सोन्या-चांदीच्या खरेदीला वेग येण्याची शक्यता आहे. सोन्याचे दर स्थिर राहिल्यामुळे आगामी काळात ग्राहकांकडून खरेदीला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरची स्थिती आणि मागणी यानुसार सोन्याच्या दरात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.