बॅलेट पेपरवर  निवडणुक घेऊनही निकाल असा  ! भाजपला थेट...
बॅलेट पेपरवर निवडणुक घेऊनही निकाल असा ! भाजपला थेट...
img
Nandini khandare More
विरोधी पक्षांकडून ईव्हीएमला जोरदार विरोध होत आहे. यापूर्वी तर ईव्हीएमच्या माध्यमातून मत चोरीचा देखील आरोप झाला आहे. त्यामुळे मतदान हे बॅलेट पेपरवरच व्हायला पाहिजे अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून सुरू आहे.दरम्यान आता आसामच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

आसामध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. सिलचर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला असून, भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक ईव्हीएमवर न होता बॅलेट पेपरवर घेण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये भाजपला 42 जागांपैकी तब्बल 32 जागा मिळाल्या तर काँग्रेसला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावं लागलं, तर उर्वरीत जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान निवडणुकीत मिळालेल्या या यशानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लबोल केला आहे.

काँग्रेसकडून ईव्हीएम हटावचा नारा दिला जात आहे, बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी होत आहे. परंतु ते बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीत देखील आता विजय मिळू शकत नाहीत. हेच या निवडणुकीच्या निकालाले दाखवून दिलं आहे, असं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यापूर्वीच 30 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी निवडणुका या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत अशी मागणी केली होती. त्यानंतर बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीत मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group