आयफोनचा हट्ट आणि मुलासह आई वडीलांचा मृत्यू ? घटनेचा धक्कादायक उलगडा
आयफोनचा हट्ट आणि मुलासह आई वडीलांचा मृत्यू ? घटनेचा धक्कादायक उलगडा
img
Nandini khandare More
छत्रपती संभाजीनगरमध्ये काळ एक अत्यंत विदारक घटना घडली. एका मुलाने डोंगरावरून उडी घेतली त्याला वाचवण्याच्या नादात वडीलही कोसळले आणि त्याच पाठोपाठ आईनेही उडी घेतली. या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली असून आता या घटनेचं ऑलगड झाला असून त्या मुलाने डोंगरवरून उडी घेण्याचा निर्णय का घेतला याच उलगडा  झाला आहे. 

देवळाली परिसरात असलेल्या खवड्या डोंगरावरून पडून एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आई-वडील आणि मुलाचा समावेश आहे. मुलगा कुणाल चांदगुडे वय 19 वर्ष, वडील मुरलीधर चांदगुडे वय 48 वर्ष आणि आई संगीता चांदगुडे अशी या घटनेतील मृतांची नावं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही कारणामुळे मुलगा कुणाल चांदगुडे यांचा आपल्या आई-वडिलांसोबत वाद झाला होता. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे कुणाला याला आयफोन 15 खरेदी करायचा होता, त्यासाठी तो हट्टाला पेटला होता. यावरूनच त्याचा त्याच्या आई -वडिलांसोबत वाद झाला. या वादानंतर मनात राग असल्याने तो आत्महत्या करण्यासाठी खवड्या डोंगरावर पोहोचला. त्याच्या पाठोपाठ त्याचे आई-वडील देखील डोंगरावर पोहोचले, परंतु कुणाला हा कोणाचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.

त्याच्या आई-वडिलांनी या डोंगरावर तब्बल तीन तास त्याची समजूत काढली, तो डोंगराच्या अत्यंत उंच असलेल्या भागावर उभा होता. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. आई-वडील आणि स्थानिक लोकांकडून तब्बल तीन तास त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होता. पोलिसांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाली, मात्र तो काही डोंगरावरून खाली उतरण्यास तयार नव्हता.

शेवटी वडिलांचा संयम सुटला आणि त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीमध्ये दोघही डोंगरावरून खाली कोसळले, मुलगा आणि वडील खाली कोसळल्याचा धक्का कुणालची आई सहन करू शकली नाही, त्यानंतर त्यांनी देखील डोंगरावरून खाली उडी मारली. या घटनेत या तिघांचाही मृत्यू झाला आहे. एका आयफोनच्या हट्टामुळे अख्ख कुटुंब क्षणात संपलं आहे. या दुर्दैवी घटनेत तिघांचाही मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group