नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मालेगाव -चाळीसगाव रस्त्यावर बोधे फाटा येथे परिवहन बस व ट्रक यांचा भीषण अपघात झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बसने ट्रकला धडक दिल्यामुळे झालेल्या या अपघातात दोन महिला ठार झाल्या असून, 31 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
इर्शाद शेख रमजान (वय 60, रा. नाचनखेडा, पाचोरा, जि. जळगाव) असे मृत महिलेचे नाव असून, दुसर्या मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अपघात इतका भीषण होता की बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील माहिती घेण्याचे काम सुरू आहे.