धक्कादायक ! नगरसेविकेचा विनयभंग, रस्त्यात अडवून अश्लील हावभाव अन् शिवीगाळ; कुठे घडली घटना ?
धक्कादायक ! नगरसेविकेचा विनयभंग, रस्त्यात अडवून अश्लील हावभाव अन् शिवीगाळ; कुठे घडली घटना ?
img
Nandini khandare More


कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.  राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा विनयभंग करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तानाजी जाधव असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे, त्याच्यावर विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

प्रभागातील कचरा उचलला जात नसल्याच्या रागातून नगरसेविकेला रस्त्यात अडवून शिवीगाळ, अश्लील हावभाव आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. तानाजी आनंदराव जाधव याच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास संबंधित नगरसेविका वैयक्तिक कामासाठी जात असताना जाधवने त्यांना रस्त्यात अडवलं. यावेळी नगरसेविका आणि त्यांच्या वडिलांना अर्वाच्च शिवीगाळ करून अश्लील हावभाव केले. तसंच ‘बघून घेतो’, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय. ‘प्रभागातील कामं व्यवस्थित करत नाही’, असं म्हणत त्याने शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद केलंय.

जाधवने प्रभागातील घंटागाडी अडवून सरकारी कामात अडथळा आणल्याचाही आरोप आहे. यापूर्वी सुमारे दोन महिन्यांपूर्वी रात्री साडेअकराच्या सुमारास तो नगरसेविकेच्या घरी गेला होता. प्रभागात कचरा साचला असून तो दाखवण्यासाठी आताच्या आता माझ्यासोबत चला, असा आग्रह करत त्याने वारंवार मानसिक त्रास दिल्याचं तक्रारीत म्हटलंय.

तसंच प्रभागात कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या महिलांचे जाधवकडून व्हिडिओ काढले जात असल्याची तक्रार आहे. व्हिडिओ काढू नका, कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करा, अशी मागणी महिलांनी केली. मात्र, त्यानंतरही व्हिडिओ काढण्याचा प्रकार सुरू राहिल्याने अनेक महिलांनी त्याच्याविरोधात नाराजी व्यक्त केली.

या सर्व आरोपांवरून नगरसेविकेच्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिसांनी तानाजी जाधवविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group