बॉलीवूडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्री नुसरत भरुचाचा बालीमध्ये अपघात झाला असून या अपघातात ती जखमी झाली आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिच्या अपघाताची तीव्रता अद्याप समजलेली नाही.
एका वृत्तानुसार, नुसरत कामासाठी बालीला गेली होती आणि तिथे तिचा अपघात झाला. उपचारासाठी नुसरतला बालीमधील मुक्काम वाढवावा लागला आहे. अपघाताच्या सुमारे आठवड्याभरापूर्वी, नुसरतने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते.नुसरत टायगर श्रॉफच्या आगामी सिनेमाचा भाग असणार आहे. टायगर आणि नुसरतची ऑन-स्क्रीन जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे.