''या'' जिल्हयात 2 ते 4 ऑक्टोबरच्या सरकारी सुट्ट्या रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
''या'' जिल्हयात 2 ते 4 ऑक्टोबरच्या सरकारी सुट्ट्या रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
img
Nandini khandare More

यंदा राज्यात पावसाने दडी मारल्याने बळी राजावर मोठं संकट निर्माण झाले आहे. सरकारकडून राज्यात 250 पेक्षा जास्त तालुके हे दुष्काळसदृश्य परिस्थितीत असल्याचा जीआर काढण्यात आला आहे. 

दरम्यान , नांदेड जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. आगामी २ ते ४ ऑक्टोबरच्या सरकारी सुट्टीच्या काळातही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहून कामकाज पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना हे आदेश देण्यात आले आहेत. आणीबाणीची आणि संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्याने रजा घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. 

सरकारी सुट्टीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून दुष्काळसदृश्य परिस्थितीशी संबंधित कामकाजावर लक्ष ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिकांना आवश्यक त्या सुविधा आणि मदत वेळेत मिळावी यासाठी प्रशासनाने अधिकारी-कर्मचाऱ्यांना रजा न मागण्याचे निर्देश दिले आहेत. दुष्काळसदृश्य परिस्थितीत प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये कोणताही खंड पडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group