खुशखबर ! लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज  ₹1500 जमा होणार ! आजच चेक करा
खुशखबर ! लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज ₹1500 जमा होणार ! आजच चेक करा
img
Nandini khandare More
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लाडक्य बहिणींना मोठी खुशखबर मिळणार आहे.  'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी ऑन लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्यांच्या हप्त्याचे १५०० रुपये कधी मिळणार याची वाट होत्या त्यांची ही प्रतीक्षा आज संपणार आहे. कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज १५०० रुपये जमा होण्यास सुरूवात होणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्टचा हप्ता जमा होणार आहे. सामाजिक न्याय विभागाने ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी ३३९ कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. त्यामुळे पात्र बहिणीच्या बँक खात्यात आजपासून १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने ३३९ कोटी रुपये वितरित करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली होती. राज्य सरकारने यासंदर्भात शासन निर्णय देखील जारी केला होता त्यामुळे लाडकींना ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा  झाला होता.

इतर बातम्या
Join Whatsapp Group