मोठी बातमी !  ३ ऑक्टोबरची MPSC परीक्षा पुढे ढकलली; आता नवी तारीख काय ?
मोठी बातमी ! ३ ऑक्टोबरची MPSC परीक्षा पुढे ढकलली; आता नवी तारीख काय ?
img
Nandini khandare More
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२५ मधील मूल्यांकनाबाबत अनेक विद्यार्थी आणि संघटनांनी आयोगाकडे आक्षेप नोंदविलेले आहेत. सदर आक्षेप विचारात घेऊन मुख्य परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय राज्य लोकसेवा आयोगाने घेतला आहे. सर्व बाबींचा आयोगाने साकल्याने विचार करून आयोगाने दि. ३ ऑक्टोबर २०२६ पासून घेण्यात येणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच परीक्षेचे सुधारित वेळापत्रक पुढील काही दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.पेपर फुटीनंतर आगामी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेबाबत उमेदवारांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. आगामी मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका नव्याने तयार कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. मात्र, सध्या तयार असलेल्या प्रश्नपत्रिका रद्द करून नव्याने प्रश्नपत्रिका तयार करण्यात येणार आहेत का, याबाबत एमपीएससीने अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यामुळे परीक्षेला स्थगिती मिळाल्यानंतरही उमेदवारांमध्ये या मुद्द्यावर संभ्रम कायम आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ अवघ्या काही दिवसांवर आली असताना प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता.त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका नव्याने सेट करण्याची मागणी आयोगाकडे केली होती. . गरज भासल्यास परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणीही करण्यात आली होती. दरम्यान, राज्यसेवा २०२५च्या मुख्य परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनावरही काही विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतले आहेत. या आक्षेपांची दखल घेत आयोगाने उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतींचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

राज्यभरातील परीक्षार्थी आणि संबंधित घटकांशी चर्चा करून आदर्श परीक्षा पद्धतीबाबत शिफारशी करण्यात येणार आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटना तसेच काही लोकप्रतिनिधींकडून राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर आयोगाने या मागणीची दखल घेत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group