सणासुदीत साखरेचा भाव कडाडणार? ₹100 पार जाण्याची शक्यता ?
सणासुदीत साखरेचा भाव कडाडणार? ₹100 पार जाण्याची शक्यता ?
img
Nandini khandare More
काही दिवसांआधी साखरेच्या भावात कमालीची वाढ झाली होती.परंतु काहीदिवसांनी हे भाव उतरले आणि सर्वसामान्याना काहीसा दिलासा मिळाला होता परंतु आता पुन्हा एकदा साखरेच्या भावात वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

दुष्काळाचा साखर उत्पादनाला फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.साखरेचे दर शंभरीपार जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीत फराळ  महागण्याची शक्यता आहे. ७० टक्के ऊस लागवडीत घट आणि इथेनॉल निर्मिती यामुळे देशात साखर टंचाईची भीती निर्माण झाली आहे. देशाची २७० ते २८५ लाख मेट्रिक टन साखरेची गरज कशी पूर्ण करायची याची साखर उद्योगासमोर मोठी चिंता आहे.

दुष्काळाचा साखर उत्पादनाला फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ८० टक्के ऊस इथेनॉल निर्मितीकडे वळवल्यानं आणि अतिवृष्टीमुळे ब्राझीलचं साखर उत्पादन घटण्याची शक्यता आहे. २०२७ मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक असलेल्या भारताला टंचाईचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुढच्या वर्षीचा गाळप हंगाम धोक्यात येण्याची देखील शक्यता आहे. गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि यंदा अल निनोचा संकटामुळे आगामी काळात साखर शंभरी पार जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच दुष्काळामुळे ऊस लागवडीत ७० टक्क्यांची घट आणि आहे हा ऊस इथेनॉल निर्मितीकडे वळवल्यास देशात साखरेची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच साखरेचे दर शंभरीपार जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांचे टेन्शन वाढणार आहे.

साखर 100 पार का जाऊ शकते? 
गेल्या वर्षीपेक्षा ओपनिंग स्टॉक १२ लाख टन कमी झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा १९ लाख टन साखरेचं कमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात अल निनोमुळे तर उत्तर प्रदेशमध्ये लाल बुरशीमुळे उत्पादनाला फटका बसणार आहे. कारखान्यांना मिळणारा सध्याचा साखरेचा दर -४६०० रुपये प्रति क्विंटल इतका आहे. इथेनॉलकडे ऊस वळवल्यास फटका बसण्याचा अंदाज आहे. अतिवृष्टी आणि इथेनॉलमुळे ब्राझीलच्या साखर उत्पादनात देखील घट होणार आहे. जागतिक बाजारात तुटवडा निर्माण झाल्यास देशापुढे साखरेच्या टंचाईचं मोठं संकट उभं राहण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group