नाशिकरोड पाणी पुरवठा विभागातील भिमनगर बेला डिसुझा जलकुंभावरुन प्र.क्र.17, 19 व 20 मधील खालील भागात दोन वेळेस पाणी पुरवठा करण्यात येतो. याबाबत नगरसेवक व लोकप्रतिनीधी यांनी सदर भागात एक वेळेस पाणी पुरवठा करावा अशी मागणी केलेली आहे.
त्यानुसार एकवेळ पाणी पुरवठा सोडण्यासाठी करावयाचा तपशील पुढीलप्रमाणे
1) नाशिकरोड विभाग प्र.क्र. 20 : शिखरेवाडी संपूर्ण परिसर, प्रकाश नगर, महात्मागांधी सोसा, अमन सोसायटी, गंधर्व नगरी परिसर, कोलमान्य नगर परिसर, LIC रोड परिसर, पुणारोड परीसर, चंद्रमणी नगर व स्लम परिसर, आरंभ महाविद्यालय परिसर, आनंद सोसा, झेवीयर कॉलनी, गजानन मंदिर परिसर, इंगळेकॉलनी गुजराती हॉस्पीटल परिसर, शाहू नगर, मोटवानी रोड, उत्सवमंगल कार्यालय, दत्तमंदिररोड, सदगुरु हॉटेल मागील परिसर, स्वामी समर्थ मंदिर परिसर
पाणी सोडण्याची वेळ सकाळी 6 ते 8
2) नाशिकरोड विभाग प्र.क्र. 17 : भिमनगर संपूर्ण परिसर, ब्रम्हगीरी, कैलासजी सोसा परिसर
पाणी सोडण्याची वेळ सायंकाळी 6 ते 8
3) नाशिकरोड विभाग प्र.क्र. 20 : भिमनगर गैस एजंसी समोर खिस्चन कॉलनी, जिजा माता नगर स्लम, राम नगर, कला नगर १ व २ नविन जुने आशा नगर व्यापारी बँक गोरेवाडी संपूर्ण परीसर
पाणी सोडण्याची वेळ सायंकाळी 6 ते 8
4) नाशिकरोड विभाग प्र.क्र.19 गोरवाडी परिसर
पाणी सोडण्याची वेळ रात्री 8 ते 12
तरी उपरोक्त नमुद नाशिकरोड पाणी पुरवठा विभागातील भिमनगर बेला डिसुझा जलकुंभावरुन प्रायोगीक तत्वावर प्र.क्र. 20 मध्ये सकाळच्या वेळेस व प्र.क्र.17,19 मध्ये संध्याकाळच्या वेळी दि.28/09/2026 पासून एकवेळ पाणी पुरवठा करणेचे योजिले आहे.
तरी वरील परीसरातील नागरीकांनी सोमवार दि.28/09/2026 पासून वरील नमुद परिसरात दिलेल्या वेळापत्रकानुसार एकवेळ पाणी पुरवठा होईल यांची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.