तृणमूलचे नाव-चिन्ह गोठवले !   ममता बॅनर्जी यांनी  दिले नवे पर्याय; निवडणूक आयोगाला सोपवली यादी
तृणमूलचे नाव-चिन्ह गोठवले ! ममता बॅनर्जी यांनी दिले नवे पर्याय; निवडणूक आयोगाला सोपवली यादी
img
Nandini khandare More

देशातील राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असून पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळत आहे.  पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम विधानसभा जागांसाठी पोट निवडणूक होत आहे. 6 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होईल. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठी भूमिका घेतली

 केंद्रीय निवडणूक  आयोगाने ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (AITC)पक्षाचे नाव आणि जोडफूल असलेले चिन्ह तात्पुरते गोठवले आहे. ममता बॅनर्जी आणि फुटीरनेते ऋतब्रत बॅनर्जी यांच्यात पक्षाची मालकी आणि पक्ष चिन्हावरून वाद सुरू होता. न्यायालयीन आणि प्रशासकीय वादात निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश दिला. आता दोन्ही पक्षांना चिन्हाचा पर्याय द्यावा लागणार आहेत. त्यात ममता बॅनर्जी यांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी अंतिम यादी सोपवली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या 14 पानी अंतरिम आदेशानंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने त्याला कडाडून विरोध केला. तर त्याचवेळी पक्षाची तीन नवीन नावे आणि तीन चिन्हांचा हंगामी पर्याय सुद्धा समोर येत आहे. आयोगाच्या नियमानुसार, पक्षाला मूळ तृणमूल काँग्रेस या नावाशी संबंधित पर्याय सुचवता येणार होते. त्याआधारे ममता बॅनर्जी तीन कोणती नावं समोर करणार याची उत्सुकता आहे.

पक्षाची तीन नावं : ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस(ममता बॅनर्जी), तृणमूल काँग्रेस(ममता), तृणमूल काँग्रेस या नावाची शक्यता वर्तवली जात आहे.

पक्षाची तीन चिन्ह: आयोगाच्या उपलब्ध फ्री सिंबल्समधून बशी, फुटबॉल आणि टॉर्च ही तीन चिन्हं सुचवण्यात येऊ शकतात.

इतर बातम्या
Join Whatsapp Group