सेट परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर !  आता ''या'' तारखेला असेल पेपर
सेट परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर ! आता ''या'' तारखेला असेल पेपर
img
Nandini khandare More

सेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सेट परीक्षा पुन्हा एकदा पुन्हा ढकलण्यात आली असून तिसऱ्यांदा या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे त्यामुळे परीक्षा देणारे संतप्त झाले आहेत. दरम्यान आता २५ ऑक्टोबर रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'सेट' विभागातर्फे सहायक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेण्यात येणारी ४१ वी सेट परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा २५ ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. परीक्षार्थीच्या हिताचा आणि परीक्षा आयोजनातील सोयीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आले असल्याचे पुणे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 'सेट' परीक्षा २६ जुलै रोजी होणार होती. मात्र,एमपीएससी परीक्षा आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलून ६ सप्टेंबर रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले. त्याच दिवशी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची सीटीईटी होणार असल्याने पुन्हा परीक्षेची तारीख बदलून २७ सप्टेंबर करण्यात आली होती. पण आता पुन्हा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

२७ सप्टेंबरच्या आसपास केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी); तसेच इतर स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने उमेदवारांना प्रवास करून परीक्षा केंद्रावर पोहोचताना अडचणी येण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर परीक्षेची तारीख पुणे विद्यापीठाकडे बदलण्याबाबत निवेदने प्राप्त झाली होती. या निवेदनानंतर ही परीक्षा आता २५ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group