लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. गणेशोत्सवात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे. सरकार नेहमीप्रमाणे सणाचे औचित्य साधून लाडकींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची शक्यता आहे. लाडकींना ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांच्या हप्त्याचे ३००० रुपये एकत्र मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. लाडक्या बहिणी देखील या दोन्ही हप्त्याचे पैसे येण्याच आतुरतेने वाट पाहत आहेत. पण अद्याप याबाबत सरकारने अधिकृत घोषणा केली नाही.
लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. या आठवड्यात १७ सप्टेंबर रोजी गौरींचं आगमन होणार आहे. याच निमित्ताने राज्य सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करु शकतात. राज्य सरकारकडून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वितरण प्रक्रिया १६ किंवा १७ सप्टेंबरपासून सुरू केली जाऊ शकते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. फडणवीस सरकारकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही. पण लवकरच याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
सरकारकडून लाडकींच्या खात्यावर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे ३००० रुपये एकाच वेळी खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतात. आतापर्यंत सरकारने अनेक वेळा लाडकींच्या खात्यावर एकाचवेळी २ महिन्यांच्या हप्त्याचे पैसे दिल्यामुळे यंदा देखील लाडकींना गणेशोत्सवात ३००० रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. पण सरकार नेमकं एका हप्त्याचे पैसे देणार की दोन हप्त्याचे पैसे देणार हे येत्या २ दिवसांत कळेल. गौरी आगमनाच्या मुहूर्तावर सरकार लाडकींच्या खात्यावर पैसे जमा करून त्यांना खूश करणार असल्याचे सांगितले जात आहे
गणेशोत्सवात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे. सरकार नेहमीप्रमाणे सणाचे औचित्य साधून लाडकींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची शक्यता आहे. लाडकींना ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांच्या हप्त्याचे ३००० रुपये एकत्र मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. लाडक्या बहिणी देखील या दोन्ही हप्त्याचे पैसे येण्याच आतुरतेने वाट पाहत आहेत. पण अद्याप याबाबत सरकारने अधिकृत घोषणा केली नाही.