UPI यूजर्ससाठी महत्वाची बातमी ! कोणकोणत्या UPI पेमेंटवर किती शुल्क लागणार? वाचा संपूर्ण माहिती
UPI यूजर्ससाठी महत्वाची बातमी ! कोणकोणत्या UPI पेमेंटवर किती शुल्क लागणार? वाचा संपूर्ण माहिती
img
Nandini khandare More
छोट्यात छोट्या व्यहरांपासून ते मोठ्या व्यवहरांसाठी नागरिकआता  UPI चा वापर करतात आणि आता कॅश पेमेंट पेक्षा ऑनलाईन पेमेंट करणे वापरकर्त्यांना अधिक सोयीस्कर वाटत आहे. अनेक लोक मोबाईलमध्ये UPI अॅप्सचा वापर करतात. यामध्ये PhonePe, Paytm, GPay यांसह अनेक मोबाइल अॅप्स UPIची सुविधा देतात.दरम्यान, आता UPI यूजर्ससाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. 

समोर आलेय माहितीनुसार, 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारावर 0.40 टक्के मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) लागू होईल. सरकारने स्पष्ट केले आहे की हा शुल्क ग्राहकांना द्यावा लागणार नाही, तर तो केवळ निवडक व्यापाऱ्यांवर लागू केला जाईल.

सरकारकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, हे शुल्क फक्त पर्सन-टू-मर्चंट (P2M) व्यवहारांसाठी आहे. एखाद्या ग्राहकाने 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेची पेमेंट केली तरी त्याला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. हे शुल्क फक्त निवडक व्यापाऱ्यांकडून आकारले जाईल.

MDRच्या गणनेबाबतही स्पष्ट माहिती देण्यात आली आहे. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या माहितीमध्ये, 3000 रुपयांच्या खरेदीवर 0.4 टक्के MDR लागू झाल्यास 12 शुल्क आकारले जाईल. ही रक्कम व्यापारी आपल्या Acquiring Bank ला देईल. त्याचप्रमाणे, 50,000 च्या खरेदीवर 0.4 टक्के MDRनुसार 200 शुल्क आकारले जाईल.

ग्राहकांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही- 
 मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या PhonePe, Paytm, GPay यांसारख्या UPI अॅप्सच्या माध्यमातून पेमेंट केल्यास ग्राहकाच्या बँक खात्यातून कोणतेही अतिरिक्त शुल्क कापले जाणार नाही. MDR शुल्क केवळ निवडक व्यापाऱ्यांकडून आकारले जाईल. ही रक्कम व्यापाऱ्याच्या बँक खात्यातून कापली जाईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group