दहीहंडीच्या कार्यक्रमात जान्हवी किल्लेकर संतापल्याचा व्हिडिओ व्हायरल !  पण नेमकं काय घडलं होत अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा
दहीहंडीच्या कार्यक्रमात जान्हवी किल्लेकर संतापल्याचा व्हिडिओ व्हायरल ! पण नेमकं काय घडलं होत अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा
img
Nandini khandare More
एका दहीहंडीच्या कार्यक्रमात बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर हिने हजेरी लावली होती परंतु या कार्यक्रमात जान्हवी प्रचंड संतापली असल्याचा विडिओ व्हरल झाला आहे. यावरून अनेक नेटकरी विविध टिपण्णी देत असून आता खुद्द जान्हवीने या प्रसंगाचा सत्य खुलासा केला आहे.  संतापलेल्या जान्हवी किल्लेकरने तो कार्यक्रम अर्ध्यातच सोडला. यानंतर जान्हवीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता खुद्द जान्हवीने या व्हिडीओवर स्पष्टीकरण दिलं असून त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, याबाबत तिने खुलासा केला आहे.

नांदेडमधील एका दहीहंडी महोत्सवाच्या मंचावर 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर अचानक रागाने लालबुंद झाली. नेटकऱ्यांनी लगेचच असा दावा करायला सुरुवात केली की, लोकप्रिय रीलस्टार प्रणाली सूर्यवंशी हिचे मंचावर कौतुक झाल्याने आणि तिच्यासमोर दुर्लक्ष केले गेल्यामुळे जान्हवीचा अहंकार दुखावला. परंतु, या व्हायरल क्लिपमागचे मूळ सत्य पूर्णपणे वेगळे असून, खुद्द जान्हवी किल्लेकरने एका मुलाखतीत या वादामागची वस्तुस्थिती उघड केली आहे.

त्या दिवशी मंचावर घडलेला प्रसंग सांगताना जान्हवी म्हणाली की, जेव्हा ती स्टेजवर पोहोचली तेव्हा तिथे प्रचंड शांत वातावरण होते. डीजे वाजत होता, पण समोर उपस्थित असलेले लोक शांत उभे होते, ना कोणी नाचत होते ना जल्लोष करत होते. एक कलाकार म्हणून प्रेक्षकांची अशी शांतता तिला बघवली नाही. कार्यक्रम रंगात यावा म्हणून तिने स्वतः पुढाकार घेतला. जान्हवीने संयोजकांना विनंती केली, "सर, माझ्या हातात माईक द्या, मी काहीतरी संवाद साधायला सुरुवात करते." साऊंड सिस्टीमच्या कर्मचाऱ्याने तिच्या हातात माईक सोपवला. ती बोलायला जाणार तितक्यात खरा गोंधळ सुरू झाला.

जान्हवी म्हणाली, मी माइकवरून बोलणार तेवढ्यात त्या अँकरला आठवलं की आपण अँकर आहोत. तेव्हा त्याला जाग आली आणि त्याने घाईघाईत माईकवर ओरडून अनाउन्समेंट केली, 'आपल्यासमोर बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर आहेत, त्या दोन मिनिटे आपल्याशी बोलतील.' पण ते वाक्य पूर्ण होते ना होते, तोच अँकरने लगेचच बाजूला उभ्या असलेल्या रीलस्टार प्रणाली सूर्यवंशीचे नाव घेत म्हणाला, "आता प्रणाली तुमच्याशी बोलेल, तिचे प्रसिद्ध डायलॉग्स कोणाकोणाला ऐकायचे आहेत?" जान्हवीच्या हातात माईक असताना, थेट दुसऱ्याचे नाव पुढे ढकलल्याने जान्हवीचा पारा क्षणात चढला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group