पोलिस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज समोर आली आहे. राज्यात लवकरच ८१०० पोलिसांची भरती होणार आहे. गृह मंत्रालयाकडून यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यातील जून २०२७ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस अंमलदारांची माहिती गृह मंत्रालयाने मागवली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११७ पोलिसांची पदं भरली जाणार आहेत. नवीन वर्षात म्हणजे २०२७ मध्ये पोलिस भरतीला सुरूवात होईल, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
राज्य सरकारकडून सध्या पोलिस भरती सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत विक्रमी पोलिस भरती झाल्या आहेत. गेल्या २ वर्षांपासून दरवर्षी पोलिस भरती केली जात आहे. यावर्षी १५,६३१ पोलिसांची भरती झाली. अशातच आता पुढच्या वर्षात म्हणजे २०२७ मध्ये देखील मोठी पोलिस भरती होणार आहे. पोलिस व्हायची इच्छा असणाऱ्या तरुणांनी आताच तयारीला लागावे.
जून २०२७ पर्यंत राज्यातील रिक्त असणाऱ्या जवळपास ८१०० पोलिसांच्या रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. तर मागच्यावेळी भरती झालेल्यांचे जूनपासून प्रशिक्षण सुरू झाले आहे. फेब्रुवारी २०२७ मध्ये पोलिसांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. त्यामुळे जानेवारी २०२७ पासूनच नवीन पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. या पोलिस भरती प्रक्रियेअंतर्गत ८१०० पोलिसांची रिक्त पदं भरली जाणार आहेत. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ हा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा कालावधी असणार आहे. तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत भरतीला सुरूवात होणार आहे. तरुणांनी या भरतीसाठी आताच तयारी केली तर त्यांच्यासाठी फायदेशीर राहिल