मोठी बातमी ! धनंजय मुंडेंची प्रकृती अचानक बिघडली, रूग्णालयात उपचार सुरू
मोठी बातमी ! धनंजय मुंडेंची प्रकृती अचानक बिघडली, रूग्णालयात उपचार सुरू
img
Nandini khandare More
राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत एक बातमी समोर आली आहे. धनंजय मुंडे  यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. उपचारासाठी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज सकाळी नेहमीप्रमाणे परळी येथील शासकीय विशेष अतिथीगृहात धनंजय मुंडे यांच्या 'जनता दरबारा'चे आयोजन करण्यात आले होते. मात्र, जनता दरबार सुरू झाल्यानंतर आमदार धनंजय मुंडे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने अतिथीगृहाशेजारील रुग्णालयात नेण्यात आले.

रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील उपचार सुरू केले आहेत. डॉक्टर सध्या त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, धनंजय मुंडे यांची प्रकृती बिघडल्याचे समजताच समर्थक आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

धनंजय मुंडे सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत असून, उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल, असे समजते. सध्या डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group