केतन अग्रवाल हत्या प्रकरण : तिसरा आरोपी अटकेत; पोलिसांच्या तपासात नवा खुलासा
केतन अग्रवाल हत्या प्रकरण : तिसरा आरोपी अटकेत; पोलिसांच्या तपासात नवा खुलासा
img
Nandini khandare More
पुण्यातील  केतन अग्रवाल  हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावर १८ जून रोजी केतन अग्रवालची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात चेतन चौधरी आणि सिया गोयल यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.दरम्यान आता याच प्रकरणतील तिसऱ्या आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे.त्यामुळे आत अय प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. 

केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी या दोघांना पोलिसांनी आधीच अटक केली होती, दोघेही सध्या तुरूंगात आहेत. आता याप्रकरणी आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. रितेश हिंगे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तो मुख्य आरोपी चेतन चौधरी आणि त्याची मैत्रीण सिया गोयल यांचा वर्गमित्र असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेशला केतनच्या हत्येच्या कटाची आधीपासून माहिती होती, असा संशय आहे. चेतन चौधरी आणि रितेश हिंगे यांच्यातील व्हॉट्सॲप संभाषणाच्या आधारे त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे संभाषण रितेशने डिलीट केलं होतं. मात्र, पोलिसांनी ते रिकव्हर केल्यानंतर तपासात महत्त्वाची माहिती मिळाल्याचं सांगण्यात येत आहे.

आरोपी चेतन चौधरी याने त्याच्या मित्राला हत्येच्या कटाची माहिती दिली होती, असा पोलिसांना संशय आहे. एवढंच नव्हे तर 18 जून रोजी , ज्या दिवशी केतनचा मृत्यू झाला, त्याच दिवशी सिया आणि चेतन यांनी त्यांच्या मित्राला, रितेशला लोहगडावर सोबत येण्यास सांगितलं होतं. मात्र त्याने त्यांच्यासोबत येण्यास नकार दिला. हत्येनंतरही चेतन आणि सिया यांचा रितेशशी संपर्क असल्याचं तपासात समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रितेश हिंगे हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून, सध्या तो बालेवाडी परिसरातील एका खासगी कंपनीत काम करतोय. न्यायालयाने रितेशला 12 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group